breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी – राज ठाकरे

पुणे | महाईन्यूज

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्धचे आंदोलन देशाच्या विविध भागांमध्ये पेटतच चालले आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलेला आहे.

देशासमोर आर्थिक मंदीचे मोठे संकट उभे आहे व त्यामुळे केंद्र सरकार मतदारांच्या कोंडीत सापडले असते. म्हणून अमित शाहांनी अशी खेळी केली की नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदणी यांसारखे मुद्दे उपस्थित करून आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळवले जात आहे. व त्यात ते यशस्वी झालेले आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button