Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच फटाके बंदीला विरोध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/images-4.jpg)
जालना – राजस्थानमधील फटाके बंदीनंतर आता राज्य सरकारही फटाके बंदीचा विचार करत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. मात्र आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात फटाके बंदीला विरोध होताना पाहायला मिळत आहे.
कोरोना विषाणूला येऊन आठ महिने झाले. त्यानंतर आता अनलाॅकही झालं. त्यामुळे सर्व फटाके विक्रेत्यांनी लाखो रुपयांचे फटाके खरेदी करुन ठेवले असून ऐनवेळेला सरकारने फटाक्यांवर बंदी घातली तर या व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं जालना फटाके असोसिएशनने म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारला बंदी घालायचीच असेल तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतल्या कंपन्यांवर बंदी घाला, एका दिवसाच्या सणावर बंदी घालून राज्य सरकार काय मिळणार आहे? असा सवाल उपस्थित करत यात फक्त राजकारण होत असल्याचं फटाके असोसिएशनने म्हटलं आहे.