breaking-newsमहाराष्ट्र
आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात मोठी घट
मुंबई – चौथ्या तिमाहीत आयसीआयसीआय बॅंकेला एकत्रित 1142 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत झालेल्या नफ्यापेक्षा हा नफा 45 टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 2083 कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्याचबरोबर बॅंकेला स्टॅड अलोन नफा 1020 कोटी रुपये झाला असून तो गेल्या वर्षापेक्षा 59 टक्क्यांनी कमी आहे. बॅंकेला थकीत कर्जापोठी मोठी तरतूद करावी लागल्यामुळे बॅंकेच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे बॅंकेने सूचित केले आहे. बॅंकेने कर्ज वाटप करताना कार्पोरेट गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप होत असतानाच हा ताळेबंद आला आहे.