breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आमदार नितेश राणेंना राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसेचा पाठिंबा; 16 जुलै जेलभरो आंदोलन
सिंधुदुर्ग – मुंबई – गोवा हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर आमदार नितेश राणे यांनी चिखल ओतला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयानं पोलीस कोठडीत केली. दरम्यान, आमदार नितेश राणेंना राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसेने पाठिंबा दिला असून 16 जुलैला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, या साऱ्या प्रकरणावर उलट-सुलट प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. त्यावर आता कोकणातील राजकीय वातावरण देखील ढवळून गेलं आहे. आमदार नितेश राणे यांच्या समर्थनार्थ कणकवलीत व्यापाऱ्यांनी बंद देखील पाळला. तोच त्यांना मिळणार राजकीय पाठिंबा देखील वाढताना दिसत आहे.