breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, संजय राऊतांनी दुसरी वात पेटवली

मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खेचून आणल्यानंतर आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला. 40 विधानसभा सदस्य असलेल्या गोव्यात सध्या भाजपच्या नेतृत्त्वात प्रमोद सावंत यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा संजय राऊथ यांनी दिला.

लवकरच गोमंतक पार्टीसोबत हातमिळवणी करुन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करु, असं संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी आमचंच सरकार येईल, अशी गर्जना संजय राऊत यांनी केली.

“गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आणि 3 अन्य आमदार हे शिवसेनेसोबत युती करत आहेत. गोव्यात नवी युती आकाराला येईल. जे महाराष्ट्रात घडलं, ते गोव्यात घडेल. गोव्यात लवकरच चमत्कार घडेल”, असं संजय राऊत म्हणाले.

ANI✔@ANI

Sanjay Raut, Shiv Sena: Goa Forward Party president & ex-Dy CM of Goa, Vijai Sardesai along with 3 MLAs, is forming alliance with Shiv Sena. A new political front is taking shape in Goa, just like it happened in Maharashtra. Jaldi hi Goa mein bhi aapko ek chamatkar dikhai dega.

View image on Twitter

1,59910:43 AM – Nov 29, 2019Twitter Ads info and privacy

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button