breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली;आंब्याच्या झाडामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण

पोलादपूर : पोलादपूर -महाबळेश्वर सुरूर राज्य मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महाडकडे जाणाऱ्या अक्कलकोट -महाड बसला वळणावर दरीत कोसळून अपघात झाला. या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. यातील १८ हून अधिक प्रवासी जखमी झाले.

पायटागावाच्या हद्दीत समोरून गाडी आल्याने ब्रेक दाबल्यानंतरं गाडी साइटपट्टीवर घसरून संरक्षक कठड्यांवर आदळून सुमारे २० फूट खोल दरीत कोसळून उलटली. गाडी आंब्याच्या झाडाला अडकल्याने सर्वांचे प्राण वाचले. मात्र, बसमधील १८ हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button