breaking-newsमहाराष्ट्र

आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार चालवून घेणार नाही

  • चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टी यांना इशारा

कोल्हापूर – लोकशाहीत कोणीलाही बोलण्याचा, आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार केल्यास प्रशासन चालवून घेणार नाही, अशा शब्दात महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उसाच्या देय रकमेसाठी आंदोलन करणारे खासदार  राजू शेट्टी यांना सोमवारी येथे इशारा दिला.

पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या देय रकमेसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यातून मोडतोड, ऊ स वाहतूक रोखणे, टायर पेटवणे असे प्रकार सुरु आहेत. आंदोलन तापवण्यासाठी स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोल्हापूर दौरम्य़ावर आल्यावर  अडवणार असल्याचा इशारा दिला होता. याविषयावर मंत्री पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना तिखट प्रतिRि या नोंदवली.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम थांबविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात  आव्हान याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत मंत्री पाटील म्हणाले,  राज्य सरकार याविषयावर आपली बाजू भक्कमपणे मांडणार आहे.  शिवस्मारकासाठी राज्य सरकारने यापूर्वी अनेक परवानग्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला वेळ लागणार नाही. तेथे सुद्धा ही याचिका रद्द होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात १९ यात्रा स्थळांना मान्यता

जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला असून जिल्ह्यातील १९ क वर्ग यात्रा स्थळांना आजच्या जिल्हा विकास नियोजनाच्या  बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कागल तालुक्यातील करडय़ाळ, हाळदवडे, आलाबाद, बेनित्र्के , खडकेवाडा, सोनके,  पन्हाळा तालुक्यातील सातार्डे, घोटवडे, बुधवारपेठ पैकी कदमवाडी, शिरोळ तालुक्यातील शिरटी, भुदरगड तालुक्यातील हणबरवाडी, शाहुवाडी तालुक्यातील पेरीड, पेंडाखळे, येलूर, गगनबावडा तालुक्यातील तिसंगी, राधानगरी तालुक्यातील पिरळ, चंद्रे, गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे आणि हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील यात्रा स्थळांचा समावेश असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button