breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये गेल्या 24 तासात 528 रुग्णांची वाढ

अहमदनगर । अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 528 जणांना कोरोनाची लागण झाली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्याची एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 801 वर पोहोचली आहे. सध्या जिल्हयात 3 हजार 208 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 132 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आज 720 जणांना सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत 8 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली आहे. वाढती रुग्णसंख्या ही नगरकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button