अवकाळी पावसाचा तडाखा…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला जिल्ह्यात पाहणी दौरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Devendra-Fadanvis.jpg)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन
अकोला । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।
अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमध्ये शेतकर्यांच्या
शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी पाहणी केली.
सोयाबीन, ज्वारी,
कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान ऑक्टोबरच्या अवकाळी पावसाने झाले आहे. पण, शेतकर्यांनी अजीबात चिंता करू नये. राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या
पाठिशी उभे राहील.
राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. या आपत्तीला ओला दुष्काळ
समजून शेतकर्यांना संपूर्ण मदत दिली जाईल. शेतकर्यांना कुठल्याही
वसुलीला सामोरे जावे लागू नये, हेही सुनिश्चित केले जाईल.
अकोला येथे एक आढावा बैठक सुद्धा
घेतली. 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावेत,
त्यासाठी गावा-गावांत शिबिरं आयोजित करा. कृषी विद्यापीठांनी जिल्हा
प्रशासनाच्या संपर्कात राहून आवश्यक सर्व ती मदत करावी.
पीकविम्याची मदत मिळण्यासाठी गावांतच
अर्ज भरून घ्यावे, सरकारी यंत्रणेने विमा कंपन्या आणि शेतकरी
यांच्यात समन्वयाची भूमिका वठवावी. निधीची कुठलीही कमतरता राज्य सरकारच्या वतीने
भासू दिली जाणार नाही.
योग्य व्यक्तींना लाभ देण्यासाठी
अधिकार क्षेत्राच्या बाहेर जावे लागले, तरी चालेल, पण एकही शेतकरी मदतीविना राहता कामा नये. प्रत्येकाला मदत मिळेल, यासाठी जोरकस आणि मिशन मोडवर प्रयत्न करावे, अशा
सूचना प्रशासनाला केल्या.