अल्पवयीन अभिनेत्रीच्या विनयभंगा प्रकरणी व्यावसायिकाला तीन वर्षाची शिक्षा
![घरात राहू दिले नाही म्हणून माय लेकराचा सावत्र बापाने केला खून](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Crime.jpg)
मुंबई | महाईन्यूज
विमान प्रवासादरम्यान अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४१ वर्षीय व्यावसायिक विकास सचदेव याला विशेष न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर सचदेव याच्यावर ‘पोक्सो’आणि भारतीय दंड विधानाच्या कलमांअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. देव यांनी सचदेव याला त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांत दोषी ठरवत तीन वर्षांचा कारावास सुनावला आहे. या अभिनेत्रीला भास झाल्याचा दावा सचदेवने केला होता. न्यायालयाने मात्र तो फेटळाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना महिलांना असे अनुभव वारंवार येतात, असेही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले. शिवाय तक्रारदार अभिनेत्रीने आपल्या आरोपांवरून कधीही घूमजाव केले नाही, हेही न्यायालयाने निकालात म्हटले.