breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अलिबाग हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांसह 9 जणांना अटक
रायगड – एका हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 7 मुलींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली आहे. यामध्ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.