breaking-newsमहाराष्ट्र
अनैतिक संबंधास विरोध; प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-red-theme-4.jpg)
अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी मयतचा पती व प्रेयसी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
लोणी खुर्द येथे विश्वास रंगनाथ गायकवाड हा त्याची पत्नी कल्पनासह (वय ४०) राहतो. विश्वासचे एका मुलीशी अनैतिक संबंध होते. ही बाब कल्पनाला समजली होती. तिने पतीच्या संबंधांना विरोध दर्शवला. तसेच त्याची समजूत काढण्याचा प्रय़त्नही केला. पण विश्वासला पत्नीचा काटा काढायचा होता. अखेरीस घरात कोणीही नसताना विश्वासने कल्पनाची गळा दाबून खून केला. शवविच्छेदनात ही बाब उघड झाल्यानंतर लोणी पोलिसांनी विश्वास रंगनाथ गायकवाड व प्रेयसी प्रमिला ऊर्फ शहाबाई या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विश्वासला अटक केली आहे.