breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री- मनोहर जोशी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून अनेक राजकीय दिग्गज नेत्यांनी त्यांच्यासोबच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, अटल बिहारी वाजेपेयी यांच्यामुळे मी मुख्यमंत्री झालो असल्याचे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

राजकीय योद्धा अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म (जन्म: डिसेंबर २५, इ.स. १९२४ मध्ये झाला होता. पक्षा पलीकडे जाऊन देशात त्यांचे संबंध होते. १९९१ ते २००९ दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते.

यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button