breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजब परंपरा… गाढवावर बसवून गावभर काढली जावयाची मिरवणूक

बीड |महाईन्यूज|

बीड जिल्ह्यातील विडा गावांत जावयाची मिरवणूक काढली जाते. पण ती गाढवावर. कायम रुबाबात आणि ऐटीत मिरवणारे जावई बापु चक्क गाढवावर मिरवणूक निघेल या भीतीने धूम ठोकतात पण विडा गावांतील लोक जावयाचा शोध घेतं त्यांना पकडून आणून गाढवावर बसवतात. ही या गावातील आगळी वेगळी परंपरा आहे. 101वर्षां पूर्वी सुरु झालेल्या या परंपरेला अद्याप खंड पडला नाही. या वर्षीय या शाही मिरवणुकीचे मानकरी जावाई ठरले दत्तात्रय संदीप गायकवाड ते मसाजोगचे रहिवाशी आणि विडा गावांतील बाळासाहेब मोहन पावर यांचे जावई आहेत.

केज तालूक्यातील विडा या गावी धुलीवंदनाच्या दिवशी. जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा आहे. जावाई म्हटले की सासरकडील मंडळींकडून जावयाचा थाट व रुबाब आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहाण्यासाठी मिळाला असेल. पण विड्याचं मात्र आपल्याला जावयाच्या बाबतीत थोड वेगळं चित्र पाहावयास मिळेल. धुलीवंदनाच्या दिवशी जावायाला गाढवावरून मिरवण्याची परंपरा गेल्या 101 वर्षापासून या गावात आहे ही परंपरा आहे.

गावातले ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला गावकर्‍यांनी धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून त्यांची गावभर मिरवणूक काढली होती, तेव्हा पासून गाढवावर जावयाची मिरवणूक काढली जाते. त्यांत गाढवाच्या गळ्यात खेटराची माळ घालून फिरवले जाते व गावभर जावयाची धिंड काढल्यानंतर त्यांचा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर मोठ्या मानापानाणे नाराज झालेल्या जावयला कपड्यांचा मनपसंत आहेर व सासर्‍यांकडून सोन्याची अंगठी दिली जाते. यावर्षी तो मान दत्ता संदीप गायकवाड यांना मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button