breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अकोल्यात आणखी 11 जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या 581 वर

अकोला | जिल्ह्यात परत एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संखेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामुळं अकोल्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 581 वर गेला आहे. सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आज सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट, फिरदौस कॉलनी, जुनेशहर, तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.

दरम्यान  त्यात एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती दि. 27 मे रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील असून हा व्यक्ती दि. 26 मे रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील 423 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या जिल्ह्यात 126 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button