breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी

वारीची भव्यता, सार्वजनिक आरोग्य विभागाची सज्जता

पुणे | आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी राज्यात पालखी सोहळा सुरू झाला असून १३ जूनला श्री संत गजानन महाराज मंदिर ‘श्रीं’च्या पालखीने शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण पालखी मार्गावर आतापर्यंत (१४ जून) एकूण १ हजार ७४३ वारकऱ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, देहू-आळंदी ते पंढरपुर तसेच महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो पालख्या, दिंड्या मार्गावर आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील मानाच्या विविध पालख्यांच्या मार्गावर देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा-सुविधा –

आरोग्य विभागाकडून एकूण ६ हजार ३६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत महाराष्ट्रातील विविध पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

२५८ तात्पुरत्या ‘आपला दवाखान्या’च्या माध्यमातून (प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर १ याप्रमाणे) मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.
७०७ (१०२ व १०८) रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४x७ पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

पुणे परिमंडळ पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन ४ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत सोबत राहणार आहेत.

हेही वाचा    –      ‘..म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले’; जितेंद्र आव्हाडांचं विधान 

२१२ आरोग्यदुतांमार्फत (बाईक ॲम्बुलन्स) पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे.

५ हजार ८८५ औषधी किटचे विविध दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

१३६ हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे.

महिला वारकऱ्यांसाठी १३६ स्त्रीरोग तज्ज्ञ पालखी मार्गावरील रुग्णालयामध्ये कार्यरत असतील.

पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले ८७ अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले आहेत.

पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात येत असून,

पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या किचनची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

पालखी मार्गावर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात येत आहे.

पालखी मार्गावर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button