breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown | तेलंगणाने घेतला लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय

हैदराबाद | देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने तो 7 मे पर्यंत वाढवला आहे. या निर्णयाच्या संदर्भात केसीआर सरकारकडून असे सांगितले गेले आहे की, आम्ही तेलंगणामध्ये लॉकडाऊन 7 मे पर्यंत वाढविला असून तो 8 मे रोजी संपेल.

राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे की तेलंगणामध्ये आतापर्यंत केवळ 64 लोकं परदेशातून परत आले आहेत. आता आम्ही निजामुद्दीन, दिल्ली येथे असलेल्या मारकजमध्ये सहभागी झालेल्या जमाती लोकांच्या प्रवासाच्या इतिहासांचा शोध घेत आहोत. संपूर्ण तेलंगणात याची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊ शकेल याची आम्ही खात्री देऊ असे राज्य सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयामध्ये वाढ करताना म्हटले आहे. तेलंगणा सरकारनेही राज्यातील ऑनलाईन फूड सर्व्हिस कंपनी झोमाटो, स्विगी आणि पिझ्झा वितरण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, जर पिझ्झा खाल्ला नाही तर आपण मरणार नाही. तेलंगणा सरकारने म्हटले आहे की, परिस्थितीनुसार 5 मे रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढचा निर्णय घेण्यात येतील. केसीआर म्हणाले की आम्ही विमानतळावर हवाई सेवा सुरू करू शकत नाही. इतकेच नाही तर आम्ही स्विगी, जोमाटो आणि पिझ्झा डिलीवरीवर ही बंदी घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button