breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

#Lockdown: अत्यावश्यक नसलेल्या सामानाचीही विक्री करु द्या, Amazon-Flipkart ची सरकारला विनंती

अ‍ॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्स कंपन्यांनी लॉकडाउनदरम्यान अनावश्यक वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती सरकारकडे केली आहे. यामुळे देशात करोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून अत्यंत सुरक्षित पद्धतीने आम्ही या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवू’, अशाप्रकारची विनंती या दोन्ही कंपन्यांनी सरकारकडे केली आहे.

करोना महामारीविरोधातील संयुक्त लढाईत भूमिका निभावण्याची परवानगी द्या”, अशी विनंती अ‍ॅमेझॉन इंडियाने सरकारला केली आहे. “इ-कॉमर्सद्वारे सामान वितरित करताना सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून सर्वात सुरक्षित मार्ग अवलंबला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही कटीबद्ध आहोत. दीर्घकाळापासून नागरिकांना ज्या सर्व सामानांची आवश्यकता आहे ते पुरवण्याची परवानगी देऊन करोना महामारीविरोधातील या संयुक्त लढ्यामध्ये आम्हालाही आमची भूमिका निभावू द्यावी”, अशी मागणी अ‍ॅमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. तर, फ्लिपकार्टनेही अत्यंत सुरक्षितपणे, सर्व खबरदारी बाळगून लोकांच्या गरजा पूर्ण करु असे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सरकारने इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच विक्री करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button