मोस्ट नोबल नंबर लिलावात ‘या’ नंबरसाठी लागली १२२ कोटी रूपयांची बोली
जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेटचा लिलाव
![World's Most Expensive Number Plate Auction](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/worlds-most-expensive-number-plate-780x470.jpg)
Worlds Most Expensive Number Plate : आरटीओ कार्यालयांतर्गत वाहनांना नंबर दिला जातो. ज्यासाठी काही रुपये आकारले जातात. पण मिळालेल्या माहीतीनुसार एक नंबर प्लेट करोडोंमध्ये विकली गेली आहे. आज आम्ही अशाच एका नंबर प्लेटबद्दल तुम्हाला माहीती देणार आहोत.
मोस्ट नोबल नंबरचा दुबईमध्ये लिलाव झाला, ज्यामध्ये अनेक नंबर लाखो कोटींना विकले गेले. या लिलावात P७ नंबर प्लेट सर्वाधिक किंमतीला विकली गेली आहे. ही किंमत पाहून अंदाज येईल की या किंमतीत मुंबईतील पॉश भागात कोट्यवधींचे काही फ्लॅट्स खरेदी करता येऊ शकतात.
दुबईतील मोस्ट नोबल नंबर्सच्या लिलावादरम्यान, एका कारची P७ नंबर प्लेट ५५ दशलक्ष दिरहम किंवा सुमारे १,२२,६१,४४,७०० रुपयांना विकली गेली आहे. मागील शनिवारी (८ एप्रिल) झालेल्या लिलावात त्यासाठी १५ दशलक्ष दिरहमची बोली लागली.
महत्वाचं म्हणजे लिलावावेळी ही बोली ३०दशलक्ष दिरहमवर येऊन थांबली होती, मात्र नंतर ३५ दशलक्ष दिरहमवर गेल्याने ही बोली आणखी काही काळ थांबली. मग अखेर बोली ५५ दशलक्ष दिरहमवर पोहोचली आणि ही बोली पॅनेल सातच्या व्यक्तीने लावली, ज्याने बोली गुप्त ठेवण्याची अट ठेवली.
जुमेराह येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचाही लिलाव करण्यात आला, लिलावातून सुमारे १०० दशलक्ष दिरहम (२७ दशलक्ष डॉलर) जमा झाले. कारच्या प्लेट्स आणि विशेष मोबाइल नंबरच्या लिलावातून मोठी रक्कम मिळाली आहे.