ताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगातील ही आर्मी सर्वात हेवी ड्रिंकर!

दारुशिवाय रात्रीची मैफिल हटतच नाही, सर्वाधिक झिंगणारं लष्कर कोणतं?

राष्ट्रीय : जगभरातील लष्कारात विविध प्रकारचे अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात येते. जवानांना तावून सलाखून काढण्यात येते. ड्युटीचे तास संपल्यानंतर अनेक देशाच्या लष्करात जवानाला, सैनिकाला मद्यपानाची अनुमती आहे. जगात अमेरिकन लष्करातील सैनिक सर्वाधिक दारु रिचवतात असं मानल्या जाते. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्रिटिश सैन्याचा क्रमांक लागतो. चीनमध्ये लष्करासाठी दारू प्रतिबंधीत आहे. भारतात यासाठी सवलत मिळते. ताण-तणाव, क्षीण, थकवा घालवण्यासाठी मद्यपानाची परवानगी देण्यात येते. त्यासाठी आर्मी कँटीन एक कोटा निश्चित करते. त्याप्रमाणात दारु देण्यात येते.

भारतात मर्यादीत मद्यपानास परवानगी

भारतीय लष्करात सैनिकांना एकटेपणा घालवण्यासाठी तसेच ताण-तणाव घालवण्यासाठी कामाची वेळ संपल्यावर दारु पिण्याची परवानगी देण्यात येते. काहींच्या मते त्यासाठी मर्यादा आहे. एक अथना दोन पेगपेक्षा अधिक दारू पिता येत नाही. हे प्रमाणही अलिकडे अत्यंत कमी झाल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तान आणि चीनच्या लष्कराला मद्यपान करण्यास अनुमती नाही. पण दोन्ही सैन्यातील बडे अधिकारी लपून परदेशी दारु पित असल्याचा दावा करण्यात येतो.

हेही वाचा        :          सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा

अमेरिकेतील सैन्य सर्वाधिक मद्यपी

जगभरातील लष्करात अमेरिकेन जवान सर्वाधिक दारु पितात. काही संशोधन आणि सर्व्हेनुसार अमेरिकन लष्करातील सैनिक हे अनेकदा मद्यपान करतात आणि मद्यपान करण्याची मर्यादाही पाळली जात नाही. मरीन कॉर्प्सचे जवान अत्याधिक मद्यपान करत असल्याचा गोपनिय अहवाल मध्यंतरी बाहेर आल्याने खळबळ उडाली होती. सैनिकांच्या मद्यपानाचे प्रमाण 20% तर अमेरिकन नागरिकांचे हेच प्रमाण 14 टक्के इतके आहे. तर अमेरिकन लष्करातील महिला सुद्धा अधिक मद्यपान करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली होती.

तर ब्रिटेन, दक्षिण कोरिया, जर्मनी, अंगोला आणि नायजेरिया येथील जवान सुद्धा अधिक मद्यपान करत असल्याचे समोर आले आहे. सततची दगदग, युद्धाचे ढग, कामाचा ताण यामुळे जवान दारुकडे वळत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. तर अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर राहिल्याने एकाकीपणा येतो. सामाजिक वीण तुटते. त्यातून मग मद्यपानाची सवय बळावत असल्याचे समोर आले आहे. त्यामानाने भारतीय लष्करात मद्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. सध्या चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून सीमेवरील हालचाली पाहता गेल्या काही वर्षात भारतीय लष्कराला एकदम कठीण प्रशिक्षणातून जावं लागतं आहे. तर तणाव कमी करण्यासाठी इतर साधनांचा उपयोग करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button