breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

१ मार्चपासून बदलणार ‘हे’ नियम! सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार का?

March Rule Change | उद्यापासून मार्च महिना सुरु होणार आहे. मार्च महिना सुरु होणार असला तरी या महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर किंवा रोजच्या जीवनशैलीवर परिणाम होणार आहे. मार्च महिना सुरु होताच गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये देखील बदल होणार आहे.

एलपीजी दर : एलपीजीच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करतात. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला LPG चे दर बदलू शकतात.

GST नियमांमध्ये बदल : केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. १ मार्च २०२४ पासून GST नियम बदलत आहेत. आता ५ कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉइसशिवाय ई-बिल तयार करता येणार नाही.

हेही वाचा     –    नागपूरच्या ‘डॉली चाय’ वाल्यासोबत बिल गेट्स यांची चाय पे चर्चा..!

फास्टॅग : NHAI फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी निश्चित केली आहे. म्हणजेच आजच तुमच्या फास्टॅगचे केवायसी पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा तुमचं फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करू शकतात.

सोशल मीडियाचे नवीन नियम : मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या माहितीसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या नियमांत बदल होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button