ताज्या घडामोडीराष्ट्रिय

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत घट, पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार का?

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील तणाव निवळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दरही घसरले आहेत. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुका ओसरताच महागाईचा भडका उडणार असल्याचंही म्हटलं जात आहे.रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ९६ डॉलर प्रति बॅरल पोहोचले होते. गेल्या सात वर्षांतील ही सर्वाधिक वाढ होती. तसेच, १०० डॉलरच्या पुढे तेलाचे दर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी रशियानं युक्रेनच्या सीमेवरून 1.30 लाख सैन्य मागे घेत असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या.

देशातील विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. म्हणूनच कच्च्या तेलाचे दर वाढलेले असतानाही पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशात 4 नोव्हेंबर २०२१ पासून दरात स्थिरता आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button