फेसबुक नाव बदलून ‘मेटाव्हर्स’ होणार?
![Will Facebook be renamed 'Metavers'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/facebook-672x420.jpg)
नवी दिल्ली – ‘फेसबुक’ ही जगभरातील एक मोठी नेटवर्क कंपनी आहे. फेसबुक हे सोशल मिडिया ऍप आहे. याचे जाळे जगभर पसरले आहे. मात्र फेसबुकबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. फेसबुकचे नाव आता बदलण्यात येणार आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरू आहे. पुढील आठवड्यात २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सभेत फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग हे याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. फेसबुकचे नाव बदलून ‘मेटाव्हर्स’ असे नामांतर केले जाण्याची शक्यता आहे.
इंटरनेटद्वारे लोक जेव्हा व्हर्च्युअल विश्वात भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असे म्हणतात. यात डिजिटल स्पेसचाही समावेश होतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभे केलेल्या आभासी जगाला डिजिटल स्पेस म्हणतात. त्यामुळे या रिब्रॅण्डींगद्वारे कंपनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली आणखी एका मोठ्या श्रेत्रात पूर्णपणे वेगळी सेवा निर्माण करू पाहत आहे. आधीच या कंपनीच्या उपकंपन्यांमध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप, ऑक्युलस आणि इतर कंपन्या आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या या नावबदलाबाबत चर्चांवर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे फेसबुकने सांगितले आहे.