TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

का बंद पडणार ‘सुदामा टॉकीज’?; प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचा फटका

नागपूर: नागपुरातील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील प्रसिद्ध व अर्धशतकाहून अधिक काळ नागपूरची महत्त्वाची खूण ठरलेले सुदामा चित्रपटगृह (सुदामा टॉकीज) लवकरच नवीन बहुमजली व्यापारी संकुलात रूपांतरित होणार आहे. १९७१ मध्ये राजेश खन्ना यांच्या आनंद या चित्रपटाच्या प्रदर्शनाने या चित्रपट गृह प्रथम उघडले. पूर्वी हे चित्रपटगृह सरोज टॉकीज म्हणून ओळखले जात होते.तरुण पिढीसाठी ते सुदामा आहे.
थिएटरचे मालक प्रणित सिंग म्हणाले, “सुदामा हे जुने नाव कायम ठेवले जाईल हे थिएटर सिंग यांचे आजोबा आरडी ब्योहार यांनी बांधले होते. त्यांना आजही आनंदचे स्क्रिनिंग आठवते, ज्याला थिएटरला पुरस्कार मिळाला होता. त्या काळात चित्रपटगृहांना निर्मात्यांकडून पुरस्कार मिळत असे असे सिंग म्हणाले.

“अ’ अक्षराने सुरू होणारे चित्रपट आमच्यासाठी खूप लाभदायी ठरले. आनंदप्रमाणेच अमानुष, अभिमान आणि इतर अनेक चित्रपट दीर्घकाळ चालले. एक काळ असा होता की चित्रपट १०० दिवस चालायचे आणि आता एकही चित्रपट केवळ आठवडाभर चालत नाही,” थिएटरसाठी १९७० ते १९९० च्या दशकातील मध्यापर्यंतचा सर्वोत्तम काळ होता कारण त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्ससाठी दर्शकांचा वेगळा वर्ग आहे. तथापि, कोविडनंतर प्राधान्यक्रमांमध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी सरासरी चित्रपटही आठवडाभर चालायचा. आजकाल काही सिनेमे तेवढे चालतही नाहीत, असे सिंग म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button