breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

सर्वाधिक वाढदिवस १ जूनलाच का असतात?

1 June Birthday | एका अंदाजानुसार १ जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा वाढदिवस म्हणजे ‘ऑन पेपर बर्थ डे’ असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे १९७० च्या दशकाच्या आसपास सध्या ज्या पद्धतीने जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते तसा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला वगैरे प्रकारही फारसा अस्तित्वात नव्हता.

त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असण्याचा फारसा संबंध नव्हताच. मात्र खरी गंमत पुढे आहे की अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची.

हेही वाचा    –    जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँकांना सुट्टी; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

मात्र त्यावेळेस फारसं शिक्षण नसल्याने अनेक पालक मास्तरांना ‘काय सोयीचं पडेल?’ असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही १ जून तारीख लिहू असं सल्ला देत वाढदिवस १ जून अशी नोंद करुन घ्यायचे. आता १ जूनच का तर यामागील कारण म्हणजे ही तारखी जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं असं दर्शवणारी आहे.

भारतात शालेय वर्ष जून महिन्यात सुरु होतं. त्यामुळे १ जून किंवा पुढील तारीख असेल तर त्यावेळी कमी वय असलेल्या मुलांनाही थेट पुढील वर्गात दाखला देणं सोपं व्हायचं. त्यामुळेच अनेकांच्या शालेय दाखल्यावर हीच तारीख वाढदिवस म्हणून दाखवली गेली आहे.

त्यानंतरच्या काळात जन्माच्या दाखल्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आणि त्यानंतर अनेकांनी जन्माचा पुरावा म्हणून पुढे १ जून हीच तारीख निंदवली गेली. त्यानंतर तेच कागदपत्र नोंद असणारा दाखला म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही कायमची म्हणजेच ‘ऑन पेपर’ तरी १ जूनच ही असते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button