breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडी

गणपतीला २१ दुर्वांची जुडीच का वाहतात? जाणून घ्या यामागची रोमक कथा

Ganesh Utsav 2023 : हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. आपण गणपतीचे दर्शन घ्यायला जाताना किंवा गणपतीची पुजा करतेवेळी दुर्वा घ्यायला अजिबात विसरत नाही. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. त्यामुळे गणपती प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीची पुजा करतेवेळी बाप्पाला २१ दुर्वांची मिळून केलेली जुडी अर्पण केली जाते. पण गणपतीला दुर्वा नक्की का वाहतात? याचे कारणही खास आहे.

गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. सर्व देवतांनी विनंती केल्यानंतर गणपती बाप्पाने त्या असुराला गिळून टाकले. मात्र त्यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. तर कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यासाठी दिली.

हेही वाचा – ‘गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा’; कोणी दिली ऑफर?

यानंतर बाप्पाच्या पोटात होणारी जळजळ कमी झाली. यापुढे भविष्यात जो कुणी मला दुर्वा अर्पण करेल, त्याला हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणपती बाप्पाने सांगितले. याच कारणामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. विशेष म्हणजे दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकार झाल्यास दुर्वांचा वापर केला जातो. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक ठरतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button