पैसा कमावण्याच्या बाबतीत देशातील हे राज्य आघाडीवर? महाराष्ट्राची स्थिती काय?
![Which states in India are leading in making money](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Top-3-Earning-States-780x470.jpg)
Top 3 Earning States : देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या राज्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची स्थिती काय? याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये असे दिसून आले की, सरकारी आणि निमसरकारी संस्थांनी राबवलेल्या विविध योजनांमुळं लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. तसेच भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न वाढले आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि चंदीगड ही तीन राज्ये पैसा कमावण्यात आघाडीवर आहेत. या तीन राजयांतील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कमावत्या लोकांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कुटुंबातील सदस्यांची सरासरी संख्या ४.२ होती, ती यंदा ४.३ झाली आहे.
हेही वाचा – ‘अजित पवार चार महिन्यांत तुरूंगात जाणार’; कोणी केला खळबळजनक दावा?
गेल्या वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल होता, मात्र यंदा कर्नाटकने या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बिहार हे सर्वात कमी उत्पन्न मिळवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार, भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न २५,९१० रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या २३,००० रुपयांपेक्षा सुमारे १० टक्क्यांनी अधिक आहे.