जमीन बक्षिसपत्र म्हणजे काय? ते कसे केले जाते? वाचा..
![What is a land grant and how is it done?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Land-Gift-780x470.jpg)
Land Gift : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते. यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते.
मुद्रांक शुल्क किती?
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 नुसार महाराष्ट्र राज्य भेटवस्तू डीडच्या मालमत्तेच्या मूल्याच्या 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारते आणि कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून दिली गेल्यास मुद्रांक शुल्क 200 रुपये आहे.
जमीन बक्षीसपत्र व्यवहार
आपण आपल्या मालकी हक्काची जमीन इतर कोणास कायमस्वरूपी देतो. तेव्हा त्या जमीन व्यवहारास बक्षीसपत्र असे म्हणतात.
हेही वाचा – २३ सप्टेंबरला जगभर दिवस-रात्र प्रत्येकी १२ तासांचे
रजिस्ट्री करताना काय काळजी घ्याल?
बक्षीसपत्र रजिस्ट्रीमध्ये बक्षीस कोणाला देत आहोत, त्या व्यक्तीचे आपल्याशी नाते आणि स्पष्ट कारण लिहिणे महत्त्वाचे आहे.
यांनी उपस्थित राहणे अनिवार्य :
मिळकत हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करताना त्यावर नोंदणी कायद्यानुसार लिहून देणारा व घेणारा सही व इतर सोपस्कारांसाठी सहदुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.
साक्षीदारांच्या सह्या गरजेच्या :
बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहस्तेही करता येते. परंतु त्याला पुढे कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे लिहून ठेवताना दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.