Breaking-newsताज्या घडामोडी
लग्न करण्यापूर्वी जे ३६ गुण जुळवतात ते कोणते आहेत?

Kundali Gun Milan | यशस्वी कौटुंबिक जीवनासाठी, पती-पत्नीमध्ये जुळणारे गुण असणे खूप महत्वाचे आहे, हे गुण जन्मकुंडलीद्वारे जुळतात. पण लग्न जमवताना नेमके ३६ गुण कोणकोणते पाहतात हे आपण जाणून घेऊयात..
३६ गुण कोणकोणते आहेत?
लग्न जमवताना गुणांची जुळवाजुळव करताना एकूण ८ गुणांचा विचार केला जातो. त्यामध्ये वर्ण ज्याची संख्या १, वश्य जिची संख्या २, तारा जिची संख्या ३, योनी जिची संख्या ४ आहे. तसेच ग्रह मैत्री ५ गुण, गण ६ गुण, भकूट ७ गुण, नाडी ८ गुण असे मिळून एकूण ३६ गुण होतात.
हेही वाचा – ‘मशाल निशाणी घरा घरात पोहोचवा’; मनोहर भोईर
१८ पेक्षा कमी गुण असतील तर काय?
- १८ पेक्षा कमी गुण – विवाहासाठी पात्र नाही किंवा अयशस्वी विवाह.
- १८ ते २५ गुणे – लग्नासाठी चांगली जुळणी.
- २५ ते ३२ – विवाहासाठी सर्वोत्तम जुळणी, विवाह यशस्वी.
- ३२ ते ३६ – हे एक उत्कृष्ट गुण मिलन आहे, हे लग्न यशस्वी होईल.




