दिल्लीत विकेंड लॉकडाऊन; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्णय
![Night curfew imposed in Tamil Nadu, complete lockdown on Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Maharashtra-Lockdown.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
जगासह देशात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. अशातच देशाच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, खाजगी संस्थांमधून ५० टक्के वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विकेंड कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू यापूर्वीच लागू करण्यात आला होता. दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. वेगाने वाढणारे कोरोनाचे आकडे लक्षात घेत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीमधील पॉझिटिव्ह रेट वेगाने वाढत आहे.
डीडीएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विकेंड कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये आवश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सरकारी अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.