रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू
![Waghini calf dies in train collision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/shutterstock_.jpg)
चंद्रपूर – रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोंदिया-चंद्रपूर रेल्वे रुळावर मालगाडीची धडक झाल्याने नागझिरा अभयारण्यातील टी-१४ वाघिणीच्या नर बछड्याचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, नागझिराच्या पूर्व भागातून गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग जातो. हा मार्ग अभयारण्यालगत असल्याने या क्षेत्रात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. टी-१४ वाघिणीला तिन बछडे होते. गराडा गावाजवळून जाणाऱ्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वे रुळावर मालगाडीची धडक झाल्याने तिच्या एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक बछडा जखमी झाल्याचे कळते आहे.
दरम्यान, या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा वावर असताना वन्यजीव विभाग, वन विभाग आणि रेल्वे विभाग यांच्याकडून विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.