निमगाव चोभा ग्रामपंचायतीमध्ये वर्षभरातच विविध कामांचा धडाका!
सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरपंच प्रयत्नशील
![Vijay Shelke said that we are committed for the development of the village in the next four years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Nimgaon-Choba-1-780x470.jpg)
पुढील चार वर्षांमध्ये आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध – उपसरपंच विजय शेळके
आष्टी : केंद्र आणि राज्य सरकारने जनसामान्यांसाठी तयार केलेल्या विविध योजना ग्रामपातळीवर लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सरकारकडून योजना जाहीर होतात. मात्र, त्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे ग्राउंड लेव्हलवर काम करणं अतिशय महत्त्वाचं असतं. निमगांव चोभा गावच्या सरपंच भाग्यश्री गाडे आणि कानिफनाथ ग्राम विकास पॅनलचे प्रमुख तथा उपसरपंच विजय शेळके यांनी वर्षभरातच विविध कामांचा धडाका लावला आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत कार्यालयाचा कायापालट केला. वर्षभरात विविध विकास कामं आणि गावातील लोकांना योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावात भूमिगत नाली आणि पिण्याच्या पाण्याची चिलिंग व फिल्टरची क्षमता वाढवण्यात आली आहे. हरिजन वस्तीमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले आहे.
हेही वाचा – राहुल गांधींनी सांगितलं संसदेत घुसखोरी करण्याच कारण; म्हणाले..
फिल्टरच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअर घेण्यात आला आहे. स्मशानभूमी मध्ये सुशोभीकरण, पेविंग ब्लॉक बसवले आहेत. गावात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केली आहे आणि त्या झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे. निमगाव चोभा जिल्हा परिषद शाळेसाठी एका खोलीचे बांधकाम ग्रामपंचायतने केले आहे. तसेच ग्रामपंचायतमधील विजेच्या व्यवस्थेसाठी सोलर बसवण्यात आले आहे. गावातील जगदंबा वस्तीवर नवीन पाईपलाईन केली आहे.
पुढील चार वर्षांमध्ये आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. काही बोलून दाखवण्यापेक्षा लोकांची काम करून जास्तीत जास्त विकास करण्याचा सर्वांचा संकल्प आहे.
विजय शेळके, उपसरपंच, निमगांव चोभा.