breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

संक्रांतीमुळे भाज्यांचे गगनाला भिडले; जाणून घ्या आजचे मार्केटचे ताजे दर

Makar Sankranti | भोगी आणि संक्रांतीसाठी घरात लागणाऱ्या भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात शनिवारी आणि रविवारी गर्दी झाली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कोणत्याही पावशेर भाजीचे दर ३० ते ४० रुपयांदरम्यान आहेत.

शनिवारी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजाराचे कामकाज बंद असते. त्यामुळे किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी भाज्यांची खरेदी केली. तर रविवारी मार्केट यार्ड सुरू झाल्यानंतरही मागणी कायम राहिल्याने भाज्यांचे दर तेजीत होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा   –  २६ जानेवारीला मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार 

काय आहे आज भाजीचे दर?

  • हरभरा गड्डी – २० ते ३० (एक गड्डी)
  • वालपापडी – १२० ते १४०
  • पापडी – १२० ते १४०
  • वांगी – १२० ते १४०
  • पावटा – १२० ते १४०
  • भुईमूग शेंग – १६० ते २००
  • मटार – ८० ते १००
  • गाजर – ५० ते ६०
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button