breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याआधी जाणून घ्या ७ दिवसांचे महत्व

Valentine Day | फेब्रुवारी महिना आला की प्रेमात बुडालेल्या तरूणाई मध्ये यंदाचा व्हेलेंटाईन डे खास करण्याचे वेध सुरू होतात. १४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यापूर्वी आठवडाभर प्रेमाची साक्ष देण्यासाठी विविध दिवस साजरे केले जातात. व्हेलेंटाईन डे आणि त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या सेलिब्रेशन मध्ये फुलं, चॉकलेट्स, गिफ्ट्स दिली जातात. मग यंदा तुम्हांलाही या सेलिब्रेशनचा भाग व्हायचं असेल तर जाणून घ्या व्हेलेंटाईन डे पूर्वी आठवडाभर केल्या जाणार्‍या सेलिब्रेशन मध्ये नेमका कोणता दिवस कधी आहे.

रोज डे : ७ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे.

प्रपोज डे : ८ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. कोणावर तरी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते. त्यामुळे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा डे साजरा केला जातो.

चॉकलेट डे : ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी किंवा खास मित्राला चॉकलेट्स गिफ्ट देऊन हा दिवस खास बनवू शकतात.

टेडी डे : १० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या प्रियसीला गोंडस टेडी देऊन हा दिवस साजरा करू शकता. हा दिवस व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे.

हेही वाचा     –    राज ठाकरेंना बाबरी मशीदची वीट भेट; राज ठाकरे म्हणाले.. 

प्रॉमिस डे : ११ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे असतो. या दिवशी प्रेमी आणि विवाहित जोडपे आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन देतात. तुमच्या जोडीदाराला असेच काहीतरी वचन देऊन तुम्हीही हा दिवस खास बनवू शकता.

हग डे : १२ फेब्रुवारीला हग डे साजरा करतात. असे म्हणतात की प्रेमळ हग दिल्याने सर्व दुःख आणि कटुता कमी होते. व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक प्रेमळ मिठी मारून साजरा करा.

किस डे : १३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जाण्याची परंपरा आहे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना एक किस द्या जेणेकरून ते तुमच्यासाठी सर्वस्व आहे. याशिवाय कपल्स किस देऊन एकमेकांवरचे तुमचे प्रेम आणि भावना व्यक्त करू शकता.

व्हॅलेंटाईन डे : प्रेमी कपल्ससाठी सर्वच आनंदाचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे कपल्स आणि लव्ह बर्ड्ससाठी खूप खास असतो आणि प्रत्येकाला हा दिवस आपल्या प्रेमासोबत घालवायला आवडतो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना स्पेशल सरप्राईज देतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button