breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरेंना बाबरी मशीदची वीट भेट; राज ठाकरे म्हणाले..

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी कारसेवक म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी मशिदीची वीट सोबत आणली होती. ३२ वर्षे ती वीट जपून ठेवली होती. राम मंदिर बांधून झाल्यावर ती वीट हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता. पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळा नांदगावकर यांनी बाबरीची ही वीट राज ठाकरेंना भेट म्हणून दिली. यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले की, बाबरी मशीद पडली तेव्हा अयोध्येतील कारसेवेत बाळा नांदगावकरांचाही समावेश होता. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसैनिकांमध्ये बाळा नांदगावकरही होते. तिथल्या दोन विटा ते घेऊन आले होते. त्या विटांचं वजन जास्त होतं. तुम्हाला लक्षात येईल की तेव्हाची बांधकामं कशी होती. ही वीट हातात घेऊन बघितली तर तुम्हाला याचा अंदाज येईल. तेव्हाची बांधकामं का चांगली असायची? कारण तेव्हा कंत्राटं निघायची नाहीत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा     –     ‘प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे’; रामदास आठवले

बाळा नांदगावकर म्हणाले की, तो प्रसंग फार बाका होता. तेव्हा माहिती नव्हतं की परत जिवंत येऊ की नाही. माझी इच्छा होती की जेव्हा राम मंदिर तयार होईल तेव्हा ही वीट मी बाळासाहेब ठाकरेंना सुपूर्त करेन. त्याला आता ३२ वर्षं झाली. आज बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. पण आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राज ठाकरेच आहेत. त्यामुळे माझा शब्द पूर्ण झाला.

मी दोन विटा आणल्या होत्या. माजगावचं कार्यालय बांधताना तिथे खाली एक वीट ठेवली होती. ते कार्यालय मी मनसेत आल्यानंतर शिवसेनेला सुपूर्त केलं होतं. आता ते कार्यालय यशवंत जाधवनं गिळंकृत केलं आहे. दुसरी वीट मी ३२ वर्षांपासून जपून ठेवली होती, असंही बाळा नांदगांवकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button