करोना योद्ध्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांनी वाटली चिप्सची पाकिटं
![Union ministers found packets of chips for Corona warriors](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/bjp-kishan-reddy.jpg)
नवी दिल्ली |
करोनामुळे देशात गेल्या वर्षभरापासून लॉकडाउन सदृश्य परिस्थिती आहे. अनेकांचे रोजगार त्यामुळे बुडाले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांच्या हातामध्ये काम नाही. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना आणि स्वयंसेवक हे गरजूंना मदतीसाठी पुढे आले आहेत. यांच्याद्वारे अनेकांना गेल्या वर्षभरापासून जेवण पुरवण्यात येत आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीसुद्धा करोना काळात काम करणाऱ्या कोविड वॉरियर्ससाठी मदत साहित्य म्हणून चिप्सच्या पाकिटांचं वाटप केले आहे. रेड्डी यांनी हे खाद्य पदार्थ भाजपा दिल्ली अध्यक्ष आदर्श कुमार गुप्ता यांच्याकडे स्वाधीन केले. शनिवारी दिल्ली भाजपातर्फे चिप्सच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं. दिल्ली भाजपा अध्यक्ष आदर्श कुमार गुप्ता यांनी हे कोविड वॉरियर्ससाठी आणि महापालिकेतील कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे सांगितले.आदर्श गुप्ता यांनी ट्विटरवर यासंदर्भात फोटो टाकून माहिती दिली आहे. “आज गृह राज्य मंत्री किशन रेड्डी यांनी दिल्ली भाजपाला खाण्याच्या वस्तू दिल्या. या वस्तू सेवा ही संघटनच्या अंतर्गत दिल्लीतील भाजपाद्वारा चालवण्यात येणाऱ्या कॅम्पमधल्या लोकांबरोबर दिल्लीतील महापालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यात येणार आहे” असे गुप्ता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आज गृह राज्य मंत्री @kishanreddybjp जी द्वारा @BJP4Delhi को खाद्य सामग्री दी गई।
यह सामग्री #SevaHiSangathan के अंतर्गत दिल्ली भर में भाजपा द्वारा चलाए जा रहे कैंप में जरूरतमंदों के साथ-साथ दिल्ली की सेवा में कार्यरत निगम कर्मचारियों व पुलिस कर्मियों के बीच वितरित की जाएँगी। pic.twitter.com/0U1R11aXgP
— Adesh Gupta (@adeshguptabjp) May 22, 2021
केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री @kishanreddybjp ने कोरोना वारियर्स को बांटने के लिए प्रदेश अध्यक्ष श्री @adeshguptabjp को खाद्य सामाग्री भेंट की। pic.twitter.com/kP71KlpL5M
— BJP Delhi (@BJP4Delhi) May 22, 2021
करोना रुग्णांच्या कुटुंबियांना सुद्धा या आजाराची लागण झाली आहे. लॉकडाउमुळे अनेक कुटुंबं २ ते ४ दिवसांपासून उपाशी आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडलं आहे असे आदेश गुप्ता यांनी म्हटलं आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपाशासित राज्यांना करोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी योजना आखण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना नड्डा यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.