breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल तीन कोटी किंमतीचे सोन्याचे दोन हात अर्पण

तिरुपती | टीम ऑनलाइन

देशविदेशातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामीच्या ( तिरुपती बालाजी) चरणी एका भाविकाने सोन्याचे दोन हात अर्पण केले असून या हातावर डायमंड आणि रुबी आहे. याची किंमत ही तब्बल तीन कोटी रुपये असून या हातांचे वजन सुमारे 5.3 किलो आहे. काही दिवसांपूर्वी श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला एका भाविकाने सोन्याची तलवार अर्पण केली होती. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. हैदराबादचे उद्योगपती एम एस प्रसाद यांनी ही तलवार तिरुपती चरणी आपल्या भक्तीखातर दान म्हणून दिली आहे. देवाला सोने अर्पण करणे याला आध्यात्मिक महत्त्व असण्यावर विश्वासाचा भाग आहे. अनेक धनिक लोक देवाला पैसे देण्याच्या ऐवजी हिरे, मोती आणि सोने यांचाच चढाव चढवतात. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button