ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

ट्रम्पतात्या अत्यंत हुशार, का प्रचंड अहंकारी अन् भंपक !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व आता प्रचंड गूढ वाटू लागले आहे. इतके की, पूर्वीचे ट्रम्प आणि आत्ताचे ट्रम्प यामध्ये जमीन-आसमानचा फरक जाणवतो आहे. मधल्या काळात सत्ता गेल्यामुळे असेल किंवा त्यांना संपूर्ण जगातून मिळालेल्या वागणुकीमुळे असेल, पण हे गूढ व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अत्यंत अहंकारी आणि हुकूमशाही पद्धतीने वागत आहे, हे मात्र नक्की !

संपूर्ण जग पाहिजे मुठीत!

अमेरिका ही महासत्ता आहे, हे संपूर्ण जगाने पूर्वीपासूनच मान्य केले आहे. पण दोन देशांमध्ये झुंज लावायची आणि नंतर ती सोडवायची असा नवा उद्योग डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केला आहे की काय, असे वाटू लागले आहे. दोन देशांमधील लढाई किंवा संघर्ष मीच थांबवला, असे म्हणण्याची त्यांची घाई असते. पण, त्याला यश येत नसते. ट्रम्प यांनी सांगितले म्हणून संघर्ष थांबला, हे मान्य करायला कोणतेच देश तयार नाहीत. संपूर्ण जगाने आपल्या पंखाखाली राहावे आणि आपले निर्णय ऐकून त्यांना मुठीत ठेवावे, असे ट्रम्प यांना वाटत असावे..

रशिया, युक्रेनने झिडकारले..

गेले सुमारे तीन वर्षे रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. ते थांबवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्या दोन्ही देशांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव झिडकरला. युक्रेनच्या अध्यक्षांनी तर ट्रम्प यांची पत्रकार परिषदेत चेष्टा केली आणि रशियाचे अध्यक्ष त्यांना जुमानत नाहीत. त्यानंतर झाला तो भारत-पाकिस्तान संघर्ष ! त्यावेळी सुद्धा ट्रम्प यांनी परस्पर युद्धविरामाची घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन्ही देशांना विचारूनच तो निर्णय घेतला. पण, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले अडचणीत आले. त्यानंतर आताचा इस्रायलआणि इराण यांच्यातील संघर्ष ! ही लढाई सुद्धा थांबल्याची घोषणा ट्रम्प यांनीच केली. प्रत्यक्षात इराण किंवा इस्रायलने न थांबता एकमेकांवरील क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत.

हेही वाचा – ‘राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध ‘; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

ट्रम्प तोंडावर आपटले..

ट्रम्प यांची एकूण भूमिका पाहून जगात शांतता नांदवायचा त्यांचा प्रयत्न हा नोबेल पुरस्कारासाठी आहे की काय असे अनेकांना वाटते. तथापि, इराणच्या युद्धबंदीमध्ये मात्र ते तोंडावर आपटले आहेत. आपण एक महान शांतीचे पुरस्कर्ते नेते आहोत, हे दाखवून देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न असतो. पण, या प्रयत्नात पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाचा पोकळपणा दिसून आला आहे. इराणने त्यांना जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे ट्रम्प हे एक तर अत्यंत हुशार असावेत किंवा बिनडोक आणि भंपक असावेत, असे आता संपूर्ण जगाला वाटू लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची विश्वासार्हता..

अमेरिका हा जगातील सुपरपॉवर देश आहे. पण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचचे वर्तन मात्र प्रतिमेला अजिबात साजेसे नसते. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गरजेपेक्षा जास्त बोलण्याची किंवा बडबड करण्याची सवय आणि श्रेय घेण्याची हाव यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. भारत-पाकिस्तानच्या बाबतीत जे त्यांनी केले, तेच आता इराण-इस्रायलच्या बाबतीत केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण-इस्रायलमध्ये सीजफायर झाल्याची घोषणा केली. आपण हे युद्ध थांबवले, असा त्यांचा दावा होता. पण, पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा दावा किती निराधार, खोटा आहे, ते सिद्ध झाले आहे. इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाईल हल्ला केला आहे आणि ट्रम्प यांना कळविले आहे.

इराणकडून मिसाईलचा पाऊस..

दुसरीकडे, इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर मिसाईलचा पाऊस पाडला. इराण फक्त इस्रायलवर मिसाईलच डागत नाही, तर अमेरिकासुद्धा त्यांचे टार्गेट आहे. मध्य-पूर्वेमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर मिसाईल हल्ले सुरु आहेत. आधी कतार, मग इराकमधील अमेरिकेच्या तीन ठिकाणांवर मिसाईल हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांवरुन इराणचा इरादा किती मजबूत आहे, ते दिसून येतते. मध्य पूर्वेतील हा तणाव आणखी वाढू शकतो, हे स्पष्ट आहे.

मिसाईल्स हवेतच नष्ट..

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजत आहेत. लोक बंकर्सच्या दिशेने पळत आहेत. इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदीद एअरबेसवर मिसाईल हल्ला केला. त्यांनी एकाचवेळी अनेक मिसाईल्स डागली. पण, अमेरिकेने बुहतांश मिसाईल्स हवेतच नष्ट केली. सध्या तरी कुठले नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अल उदीद एअर बेस मध्य-पूर्वेमधील अमेरिकन सेंट्रल कमांडच्या एअर ऑपरेशन्सच मुख्यालय आहे.

इराणचा सुप्रीम लीडर काय म्हणतो?

इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेई यांनी ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘आम्ही कुठल्याही परिस्थितीत हल्ला सहन करणार नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही.इराण अमेरिकेच्या कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे.’

अमेरिकेची दादागिरी किती दिवस?

ताकदीच्या आणि पैशाच्या जोरावर संपूर्ण जगावर दादागिरी करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे मनसुबे असून त्याला हळूहळू कोणी जुमानत नाही अशी अवस्था आहे. जे सर्वसामान्याला समजते, ते ट्रम्प यांना समजत नसेल का?

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button