केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार, जाणून घ्या कुठल्या राज्यात कधी होणार पाऊसाची ‘एंट्री’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/mahaenews-59-780x470.jpg)
Monsoon News । देशभरात कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. आज गुरुवारी ३० मेला नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मान्सून आता ईशान्य भारतातील बहुतांश भागात पुढे सरकू लागला आहे. रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात आधीच पाऊस झाला आहे, जो मान्सूनच्या आगमनाबरोबर वाढणार आहे.
यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वीच चक्रीवादळ रेमलचे आगमन झाले होते, त्यामुळे मान्सूनचा प्रवाह झपाट्याने बंगालच्या उपसागरात पोहोचला होता. यामुळे ईशान्येकडेही ढग वाढू लागले आहेत. रेमलमुळे शनिवारपासून पश्चिम बंगाल, ओडिशासह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे.
नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे IMDने बुधवारीच स्पष्ट केले होते. मान्सून वेळेपूर्वी दाखल होईल, अशी अपेक्षा विभागाने व्यक्त केली होती. 31 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 30 मे रोजीच मान्सूनचे आगमन झाले आहे. बुधवारपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कोची आणि तिरुवनंतपुरम शहरात पाणी साचले आहे.
हेही वाचा – ‘आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून…’; जयंत पाटील आव्हाडांच्या मदतीला सरसावले
साधारणपणे, मान्सून 5 जूनपासून अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रवेश करतो. मात्र, ढग ईशान्येकडे सरकत असल्याने एक-दोन दिवसांत येथे मान्सूनचे ढग दाखल होतील, असा अंदाज आहे. दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप, बंगालच्या उपसागराच्या विविध भागात मान्सून पुढे सरकणार असल्याची आशा IMDने व्यक्त केली आहे. या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मात्र, मान्सूनचे ढग उत्तर भारतात कधी पोहोचणार हा सर्वात मोठा प्रश्न कायम आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 15 जूननंतर मान्सून दिल्लीत दाखल होईल. त्याचप्रमाणे मान्सून 18 ते 25 जून दरम्यान उत्तर प्रदेश, 13 ते 18 जून दरम्यान बिहार, 25 जून ते 6 जुलै दरम्यान राजस्थान आणि 16 ते 21 जून दरम्यान मध्य प्रदेशात पोहोमान्सून देशासाठी महत्त्वाचा का आहे?
पावसाळ्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा तर मिळतोच, पण शेतीसाठीही हे खूप महत्त्वाचे आहे. एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ५२ टक्के क्षेत्र हे मान्सूनवर अवलंबून आहे. देशातील 40 टक्के उत्पादन येथून होते. देशाची ४७ टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. याशिवाय वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय भरण्यासाठीही पावसाळा आवश्यक आहे.चण्याची शक्यता आहे.