breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

आज वर्षातले पहिले सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? वाचा सविस्तर..

Surya Grahan 2024 | आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिलला आहे. हे सूर्यग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या ५४ वर्षात पहिल्यांदाच असे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा त्याचा सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पडण्याऐवजी चंद्रावर पडतो. अशास्थितीत चंद्राची सावली पृथ्वीवर काही काळ सूर्यप्रकाश रोखून ठेवते. या घटनेलाच सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण वेळ 

वर्षातले पहिले सूर्यग्रहण हे ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९.१२ मिनिटे ते मध्यरात्री २ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहणार आहे.

हेही वाचा    –    ‘योगींनी युपीतच थांबावं, तिथे भाजपाची..’; संजय राऊतांचा हल्लाबोल 

सूर्यग्रहण कुठे दिसणार?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका , कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, इंग्लंड आणि आणि आयर्लंडच्या उत्तर-पश्चिम भागात दिसणार आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळी या चुका करु नका

  • सूर्यग्रहणात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.
  • या काळात कोणतेही अन्नपदार्थ शिजवू नये तसेच सेवनही करु नये.
  • सूर्यग्रहणात तुळशीचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करुन घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
  • या काळात मंदिरातही जाऊ नये असे म्हटले जाते.
  • सूर्यग्रहणात सुरी, चाकू सारख्या धारदार वस्तूंना स्पर्श करु नये, तसेच नखे कापू नका, दाढीही करु नका.

(टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही त्याचे समर्थन करत नाही.)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button