TMC म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन; नरेंद्र मोदींचा टोला
![TMC stands for Transfer My Commission; Narendra Modi's toll](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Narendra-MOdi-PTI.jpg)
मुंबई |
टीएमसीचा अर्थ ट्रान्सफर माय कमिशन असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुलिया येथील रॅलीला संबोधित करताना मोदींनी टीएमसी तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. टीएमसीने बंगालमध्ये माओवाद्यांची नवी जात निर्माण केल्याचंही ते म्हणाले आहेत. “ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या वनवासाची साक्षीदार आहे. या भूमीवर सीताकुंड आहे. जेव्हा सीतामाता तहानेने व्याकुळ होती तेव्हा प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारुन पाणी काढलं होतं अशी कथा आहे. आणि याच पुरुलियामध्ये पाण्याची समस्या असणं विडंबना आहे,” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
This land is a witness to Lord Ram and Goddess Sita's exile. This land has Sitakund. It is also said that when goddess Sita was thirsty, Lord Ram got water from the ground by hitting it with an arrow…It is an irony that Purulia faces water crisis today: PM Narendra Modi pic.twitter.com/AW82k661JZ
— ANI (@ANI) March 18, 2021
West Bengal: PM Narendra Modi arrives at Purulia where he will address a public rally shortly.#WestBengalElections2021 pic.twitter.com/rR8MKmS2zT
— ANI (@ANI) March 18, 2021
नरेंद्र मोदींनी यावेळी ममता बॅनर्जींचं सरकार पुरुलियाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. “आधी डावे आणि नंतर टीएमसी सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्दतीचं काम व्हायला हवं होतं तसं काम झालं नाही. पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याची मला कल्पना आहे. टीएमसी सरकार आपल्या खेळात व्यस्त असून शेतीकडे दुर्लक्ष करत आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.