लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!
मुंबई – कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. अनेकांचा रोजगार गेला तर कित्येकांना कमी पगारात काम करावं लागत आहे. रोज कमावून खाणाऱ्यांची काय दशा होत आहे याचा विचारही न केलेले बरा. अशात लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांसाठी वोडाफोन आयडियाने मोठी घोषणा केली आहे.
वोडाफोन आयडियाने ने कोविड-19 रिलीफ ऑफरअंतगर्त आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा देण्याची घोषणा केली आहे. कंपनी ग्राहकांना मोफत 75 रुपयांचा रिचार्ज देत आहे. Vi ने आपल्या या ऑफरला Unlock 2.0 Benefit असं नाव दिलं आहे.
जे ग्राहक लॉकडाउनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी कंपनीने या प्लॅनची घोषणा केली आहे. नवीन ऑफरअंतगर्त ग्राहकांना Vi ते Vi नेटवर्कवर कॉलिंगसाठी 50 मिनिटे मोफत मिळतील. तसेच युजर्सना 50MB डेटा देखील मोफत देण्यात येईल. हा प्लॅन 15 दिवस वैध असेल.
दरम्यान, रिचार्जसाठी पात्र आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी वोडाफोन आयडिया ग्राहकांना USSD कोड 44475# डायल करावा लागेल. तसेच 121153 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या ऑफरची माहिती देत असल्याचं कळतंय.