breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर कोणतेही निर्बंध नाही, सरकारचा निर्णय मागे

Laptop Import : विदेशातून लॅपटॉप देशात आणणे यासाठी कोणतीही बंधने नाहीत, लॅपटॉपच्या आयातीसाठी परवान्याचे बंधनही घातले गेलेले नाही, असे केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बरठवाल यांनी स्पष्ट केले आहे.

लॅपटॉप, टॅबलेट्स आणि कॉम्प्युटर यांच्या आयातीसाठी परवाना असणे आवश्यक आहे, असे यापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केले होते. ही परवाना पद्धत १ नोव्हेंबरपासून लागू होणार होती.

हेही वाचा – ‘उदयनराजेंनी आधी निवृत्त व्हावं’; एकनाथ खडसेंची खोचक टीका

लॅपटॉपच्या बाबतीत आयातीसाठी कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. लॅपटॉपची आयात करणाऱ्या व्यक्तीच्या कारभारावर पाळत ठेवणे मात्र गरजेचे आहे. यामुळे आशा आयातीवरही लक्ष ठेवता येईल, असे बरठवाल यांनी सांगितले आहे. लॅपटॉपची नेमकी किती आयात होत आहे.

एकावेळी किती लॅपटॉप देशात आणले जात आहेत या सर्वांवर लक्ष ठेवून मिळणारी माहिती सातत्याने अद्ययावत करण्यासाठी सरकार अशा व्यवहारांवर लक्ष देणार आहे. त्यामुळे निर्बंध लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही बरठवाल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button