सूर्यमालेतील ‘या’ ग्रहावर आहेत एलियन्स! नासाच्या शास्त्रज्ञाने केला जाहीर खुलासा
![There are aliens on this planet in the solar system! A NASA scientist made a public disclosure](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/NASA-780x470.jpg)
NASA : पृथ्वी वगळता इतर ग्रहांवर एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. यासंबंधी वेगवेगळे दावे प्रतिदावे करण्यात येत असतात. पण अद्यापही एलियनचं अस्तित्व सिद्ध करणारा एकही पुरावा सापडलेला नाही. आतापर्यंत फक्त वेगवेगळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यातच आता नासाच्या एका वैज्ञानिकाने शुक्रावर एलियन असू शकतात असा दावा केला आहे. माणसाला सहन न होणाऱ्या शुक्र ग्रहावरील वातावरणात एलियन लपून बसलेले असू शकतात असं या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे.
अमेरिकेतील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील संशोधन शास्त्रज्ञ डॉ मिशेल थॅलर यांनी हा नवीन सिद्धांत मांडला आहे. मिशेल थॅलर यांच्या म्हणण्यानुसार, कार्बनडाय ऑक्साईडने भरलेल्या वातावरणात जीवन असण्याची चिन्हं याआधीही दिसली आहेत. ते पाहता कुठेतरी जीवन अस्तित्वात असेल याची खात्री होत आहे. ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ मिशेल थॅलर यांनी यांनी म्हटलं आहे की, शुक्रावरील वातावरणात जीवन असेल याची चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा – ‘एका हातात छत्री, एका हाती स्टेअरिंग’; एसटी बसचा व्हिडीओ व्हायरल
मला कधीच शुक्रासंबंधी अपेक्षा नव्हती. पण शुक्रावर आता असं वातावरण आहे, जे बॅक्टेरियाद्वारे तयार केले जाऊ शकते असे दिसते, असं त्या म्हणाल्या आहेत. शुक्राचा आकार आणि रचना पृथ्वीप्रमाणेच असल्याने त्याला ‘पृथ्वीचा जुळा’ असं म्हटलं जातं. पण तेथील वातावरण पृथ्वीपेक्षा पूर्ण वेगळं आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, शुक्र ग्रहावर माणसाला राहणं अशक्य आहे.
मंगळावर आणि बाहेरील सौरमालेतील बर्फाळ चंद्रांमध्ये आपल्याला अलौकिक जीवन किंवा जीवाश्म सापडण्याची शक्यता आहे. याचं कारण मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फासह त्या ग्रहांवर द्रवरूप पाणी असते. मंगळ आणि बर्फाच्छादित चंद्रांमध्ये देखील एक भूवैज्ञानिक रेकॉर्ड आहे ज्यामुळे जीवाश्म जतन केले जाऊ शकतात, असं प्रोफेसर पॅपनेउ म्हणाले.