breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच गुन्हा दाखल

बंगळुरू – मागील आठवड्यात बंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली होता. त्याला गुरुवारी सशर्त जामीन मंजूर झाला. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. डिलिव्हरी बॉय कामराजने स्वतःवरील सर्व आरोप नाकारत आता त्याच्यावर आरोप करणाऱ्या मॉडेल आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर हितेशा चंद्रानी हिच्यावरच उलट आरोप केले आहेत. इतकेच नाही तर, कामराजच्या तक्रारीनंतर बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात हितेशाविरोधात आयपीसी कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?
हितेशाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करून ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून झॉमेटॉच्या डिलिव्हरी बॉयने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली. नंतर झोमॅटोनेही या घटनेची गंभीर दखल घेत हितेशाची माफी मागितली आणि डिलिव्हरी बॉयचे तात्पुरते निलंबन करत असल्याचे जाहीर केले. मात्र आता डिलिव्हरी बॉयनेच हितेशावर उलट आरोप केले आहेत.

पहिल्यांदा हितेशानेच मला शिव्या दिल्या आणि चपलेने मारले, असा आरोप कामराजने केला आहे. ट्रॅफिकमुळे आणि रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मला डिलिव्हरी करण्यास थोडा उशीर झाला होता, त्यामुळे मी त्यांची माफी मागितली पण त्या खूप रागात होत्या. त्यांनी डिलिव्हरीचे पैसै देण्यास नकार दिला आणि झोमेटॉच्या कस्टमर केअरसोबत बोलत असल्याचे सांगितले. त्याचवेळी झोमॅटो सपोर्ट स्टाफने त्यांची ऑर्डर रद्द केल्याचे मला समजले. त्यावर मी त्यांच्याकडून ऑर्डर परत मागितली पण त्यांनी सहकार्य केले नाही. अखेर मी ऑर्डर न घेता इमारतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचवेळी त्यांनी मला चप्पलेने मारायला सुरुवात केली. मी स्वतःचा बचाव करत होतो पण मला मारण्याच्या नादात हितेशा यांच्या हातातील अंगठी त्यांच्याच नाकावर लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. असा आरोप कामराजने केला आहे. त्यामुळे आता दोघांपैकी नक्की कोण खरं बोलतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button