स्पॅम कॉलची समस्या सुटणार, लागणार तब्बल ‘इतक्या’ वर्षांसाठी बंदी
![The problem of spam calls will be solved, it will be banned for 'so many' years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Spam-Call-780x470.jpg)
Spam Call | स्पॅम कॉलची समस्या सोडवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने ट्रायने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे किंवा सर्व ऑपरेटर्सवर दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) या बाबत नवी नियमावली लागू केली आहे. १ सप्टेंबर पासून ही नवी नियमावली लागू केली जाणार आहे. स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे किंवा सर्व ऑपरेटर्सवर दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाणार आहे. ट्रायने स्पॅम कॉल्सची समस्या सोडवण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा – ‘सुवर्णपदक जिंकणाराही माझा मुलगाच आहे’; नीरज चोप्राच्या आईने मन जिंकलं!
टीएसपीच्या माध्यमातून ही माहिती इतर सर्व टीएसपीद्वारे सार्वजनिक केली जाणार आहे. नव्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या कंपन्यांच्या सर्व दूरसंचार सेवा खंडित करून अशा प्रकारच्या सेवा देणारया कंपन्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी ब्लॅकलिस्ट केल्या जाणार आहेत.