breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

अंघोळ झाली स्वस्त! साबणाच्या किंमती होणार कमी?

देशातील मोठ्या एफएमसीजी कंपन्यांच्या सीईओंनी महत्वाचे संकेत दिले आहेत. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर १८ महिन्यांतील सर्वात कमी ४.७% वर आल्यानंतर आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे. साबण, तेल, पेस्ट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या (एफएमसीजी) किंमती कमी होणार आहेत.

ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मॅरिको यांसारख्या नोंदणीकृत कंपन्यांच्या सीईओंनी म्हटले की, तृणधान्ये आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किंमती कमी झाल्यामुळे त्यांच्या कमाईत वाढ झाली असून त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.

हेही वाचा – ‘बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या..’; सुषमा अंधारे मारहाणप्रकरणी शिंदे गटातील नेत्याची प्रतिक्रिया

दरम्यान तांबे व ॲल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किंमती स्थिर झाल्यामुळे व्होल्टास, हॅवेल्स आणि ब्लू स्टार सारख्या कंपन्यांनी एसी, फ्रिजसारख्या उत्पादनांच्या किंमती वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.

विक्रीवर लक्ष ठेवणारी संस्था नीलसन आयक्यूच्या मते, दीड वर्षाच्या घसरणीनंतर जानेवारी-मार्च प्रथमच ग्रामीण भागातील खप ०.३% वाढला आहे. तथापि, शहरी भागात विक्री वाढ ५.३% वर सपाट राहिली. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, एप्रिलमध्ये किरकोळ क्षेत्रातील विक्री ६% वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button