iPhone १६ लाँच होताच iPhone १५ ची किंमत घसरली! जाणून घ्या नवीन किमती
Apple iPhone 16 | कॅलिफोर्निया येथील आयफोनच्या मुख्यालयात यावर्षीचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट घेण्यात आला. ज्यामध्ये आयफोन १६ सिरीजसह इतर उत्पादने कंपनीने विक्रीसाठी खुली करण्याची घोषणा केली. नव्या आयफोनची प्री बुकिंग १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २० सप्टेंबरपासून विक्री करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. नवीन मालिका लाँच केल्यामुळे, Apple ने जुन्या iPhone १५ सह अनेक मॉडेल्सच्या किमतीत कमालीची घट केली आहे.
iPhone १५ किंमत किती?
iPhone १६ लाँन्च झाल्यानंतर iPhone १५ च्या किंमतीमध्ये १० हजार रूपयांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आयफोन १५ या नव्या मॉडेलची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा त्याची सुरुवातीची किंमती ७९,९०० इतकी होती. तर आयफोन १५ प्लस ८९,९०० ला मिळत होता. आता दोन्ही मॉडेलच्या किंमतीमध्ये दहा हजारांची घट झाली असून अनुक्रमे ६९ हजार ९०० आणि आयफोन प्लस ७९ हजार ९०० ला मिळत आहे.
हेही वाचा – ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’ हे सांगणे म्हणजे धर्म नव्हे; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
iPhone १६ ची किंमती किती?
भारतात iPhone १६ ची (१२८ जीबी) किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. त्यानंतर २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. iPhone १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर iPhone १६ प्रोची किंमत १,३४,९९० रुपये आणि iPhone १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.