देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,08,846 वर
![48 thousand 698 new corona patients in the last 24 hours in the country; 1,183 corona victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/319718852-corona-1532x900-adobestock-1.jpg)
- 24 तासांत 23,285 नवे रुग्ण
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थितीबाबत चिंता वाढत असतानाच आता देशभरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत 23,285 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 117 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,13,08,846 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 1,58,306 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 15,157 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,09,53,303 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 1,97,237 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-केदारनाथ मंदिराची दारं 17 मे पासून खुली होणार
India reports 23,285 new #COVID19 cases, 15,157 recoveries, and 117 deaths in the last 24 hours
Total cases: 1,13,08,846
Total recoveries: 1,09,53,303
Active cases: 1,97,237
Death toll: 1,58,306Total vaccination: 2,61,64,920 pic.twitter.com/S9878BAVe3
— ANI (@ANI) March 12, 2021
दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच परदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.