breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्राचे मुख्य अर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांचा राजीनामा
![The Centre's Chief Financial Adviser K. Subramaniam resigns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Krishnamurthy-Subramanian-1.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून ते पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळणार आहेत. त्यांच्या जागी नवीन आर्थिक सल्लागार कोण हे सरकारने अद्याप जाहीर केलेले नाही.
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी ७ डिसेंबर २०१८ रोजी पदभार स्वीकारला होता. ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. २०१९ मध्ये त्यांना एक वर्षाच्या अध्यायनाचा सन्मान मिळाला होता. त्यांनी सेबी आणि आरबीआयच्या तज्ञ समितीतही काम केले आहे. ५० वर्षांच्या सुब्रमण्यम यांनी खासगी क्षेत्रातील जे. पी. मॉर्गन, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएसमध्येही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.